लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- तालुक्यातील हिरडव ग्रामपंचायत येथील माजी सरपंच सौ.उज्वला चंद्रकांत घायाळ व सचिव कु.सगिता विश्वनाथ शेजुळ आणि इतर ग्रामपंचायत कार्यालय हिरडव येथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लोणार येथील दिवाणी व फौजदारी में न्यायालयात केस चालु असताना लोणार कोर्ट येथील न्यायमूर्ती श्री राउत साहेब यांनी लोणार पोलीस स्टेशन ला भारतीय दंड सहिंता १५६/३ अंतर्गत गुंन्हे दाखल करून चौकशी करण्याचे आदेश में न्यायालयाने दिनांक १६/०९/२०२२ रोजी दिले आहे.सविस्तर माहिती अशी कि, दिनांक २६/०७/२०१९ ला हिरडव ग्रा.प.अंर्तगत झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शेख जावेद शेख यासिन तांबोळी रा.हिरडव यानी आवाज उठवला ह्या पुर्ण काळाबजाराच्या विरोधात त्यांनी तिन दिवस,आमरण उपोषन ,एक आत्मदहणाचा इशारा आणि ६६ दिवस साखळी उपोषन करण्यात आले,याच प्रकरनात शेख जावेद शेख यासिन तांबोळी यांच्यावर आय.पी.सी.३५३ सारखे खोटे गुंन्हे दाखल करन्यात आले आणि त्यासाठी त्यांना जेल मध्ये सुद्धा जावे लागले तरी सुध्दा शेख जावेद यानी माघार घेतली नाही. त्यांनी त्यांचा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा सुरूच ठेवला,
पंचायत समिति लोणार बि.डी.ओ.साहेब,जिल्हा परीषद बुलढाणा येथील सिओ साहेब,डेप्टी सिओ लोखंडे साहेब,आयुक्त साहेब अमरावती,व मंत्रालय पर्यंत यानी मागील चार वर्षात असंख्य वेळेस पत्रव्यवहार केला,लोणार,बुलढाणा, अमरावती,येथे बर्याच वेळेस चक्रा मारल्या पण काही बुलढाणा जिल्हातील राजकीय दबावा मुळे हे पुर्ण प्रकरन दाबन्या करीता बर्याच वेळेस त्यांच्यावर वेगवेगळे पद्धतीने दबाव निर्माण करन्यात आले,तरी पण माघार न घेता त्यानी हा लढा सुरूच ठेवला,यात त्यांच्या गावातील नागरिकांचा शेख जावेद यांना पुर्ण पणे सपोर्ट होता,व तो सपोर्ट आज सुध्दा आहे,
या प्रकरनात डेप्टी सिओ लोखंडे साहेब जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या बुलढाणा येथील शाशकीय ऑफिस वर शेख जावेद यांनी जावुन भेट घेतली तेव्हा डेप्टी सिओ लोखंडे साहेब यांनी शेख जावेद यांना सांगितले कि सदर प्रकरणात तुम्ही कुठपर्यंत ही गेले तरी सुद्धा हिरडव येथील सरपंच व सचिव यांच्या वर कोणतेही गुंन्हे दाखल होणार नाहीत.त्यानंतर शेख जावेद यांनी न्यायासाठी लोणार येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय मधे जाण्याचा निर्णय घेतला व १५६/३ नुसार लोणार कोर्ट मधे कैस दाखल करन्यात आली.
कोर्टामध्ये शेख जावेद यांच्या बाजूने पुणे येथील वकिल एन.एच.जायभाये यांनी त्यांची बाजू न्यायलयात मांडली व सदर केस चे कामकाज बघितले.शेख जावेद यानी हा लढा न्यायालयात सुरू ठेवला,आणि दिनांक १४/०९/२०२२ रोजी सदर केस च्या संदर्भात भारतीय दंड सहिंता १५६/३ अंतर्गत गुंन्हे दाखल करून चौकशी करण्याचे आदेश में न्यायालयाने दिनांक १४/०९/२०२२ रोजी दिले आहे.पुढील तपास पोलीस स्टेशन लोणार चे उपनिरीक्षक सुरज काळे व त्यांचे सहकारी करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- Viral Video:नवरीला लागली हळद,रात्री नाचताना नवरीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,ज्या दिवशी तिचे लग्न त्याच दिवशी निघाली अंत्ययात्रा, दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा
- चुलत दीरासोबत अनैतिक संबंध, पती पत्नीमध्ये वाद, प्रियकराच्या मदतीने पत्नीने शेतकरी पतीचा केला खून; अन् अपघाताच्या केला बनाव.
- घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाने घेतले भिकाऱ्याचे सोंग; पंचायत समिती कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन.
- नवरदेव वऱ्हाडीसह लग्नासाठी मांडवात आला, अचानक मधमाशांनी केला हल्ला,नवरदेव नवरीला घेऊन पळाला,19 वऱ्हाडीं जखमी.
- दुसऱ्या तरुणाशी लग्न का केलं अस म्हणत नवविवाहित दाम्पत्याची कार अडवून नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच….