कोल्हापूर : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच प्रेम प्रकरणातील एक धक्कादायक घटना समोर आलीय. तरुणाने २१ वर्षीय तरुणीचा खून केला. त्यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील गिरोली घाटात घडलीय. ऋतुजा प्रकाश चोपडे (वय २१ ) असे तरुणीचे नाव आहे तर कैलास आनंदा पाटील (वय २८) असे तरुणाचे नाव असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.
इचलकरंजीच्या खोतवाडीमधील तरुणी ऋतुजा चोपडे हीचा कैलास पाटील याने आधी खून केला. त्यानंतर त्याने विषय प्यायले. या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. ऋतुजा आणि कैलास हे दोघे नात्यातील होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या लग्नाला काही नातेवाईकांचा विरोध होता, अशी माहिती समोर आली आहे. ऋतुजा ही बी.एस.सीचे शिक्षण घेत होती. तर कैलास व्यवसाय करत होता. माझा गावात मोठा फोटो लावा असं मित्रांना सांगत कैलास कोल्हापूरला निघाला होता. मी आज आपलं जीवन संपवणार आहे, असं तो मित्रांना बोलला होता. त्याने ‘गुडबाय लाइफ’ हे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते.
लग्नाला होत असल्याने कैलास नाराज होता. त्याने ऋतुजला मंगळवारी भेटायला बोलवले. तिला कारमध्ये बसवून तो गिरोली घाट परिसरात गेला. तिथे जाऊन त्याने आधी ऋतुजाचा खून केला. तिचा खून केल्यानेतर त्याने नातेवाईकांच्या व्हॉट्सग्रुपवर मेसेज टाकला. ‘गुडबाय’ असं लिहून त्याने विष प्यायले. व्हॉट्सअॅपग्रुपवरील मेसेज पाहून कुटुंबीय हादरले. त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी दोघांचे मोबाइल लोकेश तपासल्यावर ते गिरोली घाट परिसरात असल्याचे समोर आले. यानंतर पेठवडगाव आणि कोडोलीच्या पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर कैलासला तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे वाचलंत का ?
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.