जामनेर(प्रतिनिधी):- शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थी,शेतकरी,महिलांंसाठी २५ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरावरील महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेवक समितीचे जिल्हाध्यक्ष तथा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जिल्हा समन्वयक गणेश पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायके उपस्थित होते.
मेळाव्याला आबासाहेब पाटील(संस्थापक अध्यक्ष-शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य व मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समन्वयक),रामदास झोळ हे प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत.तर स्री सबलीकरण व सक्षमीकरण महिला उद्योग या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून सोनम पाटील या मार्गदर्शन करणार आहेत. शिवशाहीर सुरेश जाधव यांंचा पोवाड्याचे आयोजनही यावेळी केले असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली.
वैशाली शिंदे, राजाभाऊ कदम,संजय पाटील,शरद उबाळे,जयश्री पवार, लक्ष्मण पाटील,सागर धनवडे,बाळासाहेब हंगारगे यांची प्रमुख उपस्थिती मेळाव्याला राहणार आहे.मराठा मंगल कार्यालय जळगाव रोड जामनेर येथे सांयकाळी ४ वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी,महिला,शेतकरी बांधवांनी आयोजित मेळाव्याला लक्षणीय संख्येने उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.