नासिक : – लहान मुलं कधी कुठे काय करतील, याचा नेम नाही. रांगणाऱ्या वयात लहान मुलांकडे जराही दुर्लक्ष (baby Caring) करणं फार महागात पडू शकतो. तुमच्या घरात लहान मुल असेल तर ही बातमी महत्वाची आहे. मुलांकडे लक्ष न दिल्याने काय होऊ शकते, याचे उदाहरण ही घटना आहे. नाशिक (Nashik) शहरातील नाशिकरोड (Nashikroad) परिसरात आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर (Nail cutter) गिळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी नेलकटर बाहेर काढण्यात आल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आशिष शिंदे अस या बाळाचे नाव आहे.

लहान मुलं अनेकदा समोर असलेली वस्तू उचलून तोंडात टाकण्याच्या प्रयत्न करत असते. अशावेळी पालकांनी सजग राहून मुलांकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते. मात्र काहीवेळा लक्ष नसताना लहान मुलं काहीही गिळून टाकते. अनेकदा आपण बाळाने कॉईन, किंवा इतर वस्तू गिळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र नाशिकमध्ये आठ महिन्यांच्या बाळाने हे नेलकटर गिळलं. सुदैवाने ही बाब लक्षात बाळाच्या आईच्या लक्षात आली आणि त्यानंतर या बाळावर शस्त्रक्रिया करून हे नीलकटर बाहेर काढण्यात आलं आणि बाळाची प्रकृती ही व्यवस्थित आहे समोर आलं होतं.
आठ महिन्याच्या मुलाने खेळता खेळता बेबी नेलकटर गिळल्याची घटना काल दुपारी नाशिकरोड परिसरात घडली होती. मुलाने नेलकटर गिळल्याचं लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला आडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत नेलकटर बाहेर काढले. मुलाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
नेमकी घटना कशी घडली ?
नाशिक रोड परिसरामध्ये काल दुपारी हा प्रकार घडला होता. हा मुलगा घरामध्ये खेळत असतानाच त्याच्या हातामध्ये नेलकटर आल्यानंतर ते खेळत असताना त्याने ते गिळलं. यावेळी बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचा आईने बघितला. बाळाच्या आईने तात्काळ नाशिकच्या आडगाव परिसरातील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी बाळावरती शस्त्रक्रिया करत नेलकटर बाहेर काढले. सध्या मुलाची प्रकृती असून त्याला कुठलीही पोहोचलेली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नाणी, पेनाचं टोपण, या गोष्टी चिमुरड्यांनी गिळल्याचे अनेक प्रकार याआधीही पाहायला मिळाले आहेत. पण चक्क नेलकटरच आठ महिन्यांच्या बाळाने गिळल्यानं डॉक्टरांसमोरचं आव्हानही वाढलेलं होतं. सुदैवानं वेळीच उपचार मिळाले, म्हणून चिमुकल्या अक्षयचा जीव थोडक्याच वाचलाय.
हे वाचलंत का ?
- Viral Video:नवरीला लागली हळद,रात्री नाचताना नवरीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,ज्या दिवशी तिचे लग्न त्याच दिवशी निघाली अंत्ययात्रा, दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा
- चुलत दीरासोबत अनैतिक संबंध, पती पत्नीमध्ये वाद, प्रियकराच्या मदतीने पत्नीने शेतकरी पतीचा केला खून; अन् अपघाताच्या केला बनाव.
- घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाने घेतले भिकाऱ्याचे सोंग; पंचायत समिती कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन.
- नवरदेव वऱ्हाडीसह लग्नासाठी मांडवात आला, अचानक मधमाशांनी केला हल्ला,नवरदेव नवरीला घेऊन पळाला,19 वऱ्हाडीं जखमी.
- दुसऱ्या तरुणाशी लग्न का केलं अस म्हणत नवविवाहित दाम्पत्याची कार अडवून नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच….