उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथील अपघाताचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका कारने दोन तरुणांना जबरदस्त धडक दिल्याचे दिसून येत आहे. दोन्ही विद्यार्थी धडक लागताच धाडकन कारच्या बाजूला फेकले जातात. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही.
व्हिडिओ गाजियाबादच्या मसुरी येथली आहे. येथे दोन विद्यार्थी गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती. या दरम्यान ही घटना घडली. कुमार अभिशेक नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. रस्त्याच्या मधोमध दोन विद्यार्थी गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती. या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची कार वेगाने दोन लढत असलेल्या विद्यार्थ्यांना धडक देते. या घटनेत दोन्ही विद्यार्थी हवेत फेकले गेले, अशी माहिती अभिषेक यांनी पोस्टमध्ये दिली.
कार पाहून सैरावैरा धावले विद्यार्थी आणि..
आपले वर्चस्व दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये लाढाई सुरू होती. या दरम्यान एक कार विद्यार्थ्यांकडे येत असल्याचे पाहून विद्यार्थी सैरावैरा धावत सुटले, मात्र दोन विद्यार्थी या कारच्या तावडीत सापडले. या दोन विद्यार्थ्यांना कारची जोरदार धडक बसली. हा आघात इतका जोरदार होता की यात एक विद्यार्थी धाडकन कारच्या बोनटवर आदळला तर दुसरा बाजूला फेकल्या गेला.
एक विद्यार्थी उठताच त्याला..
मात्र या घटनेनंतरही मारामारी काही थांबली नाही. कारची धडक बसलेला एक विद्यार्थी उठताच त्याला पुन्हा इतर एका विद्यार्थ्याने कानशिलात वाजवायला सुरुवात केली. थाना मसुरी क्षेत्रात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहा व्हिडिओ :
कार ताब्यात
काही विद्यार्थी एकमेकांशी भांडत असताना एक कार विद्यार्थ्यांना धडकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सूरू आहे, तसेच विद्यार्थ्यांना धडक देणाऱ्या कारला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






