झुंजार प्रतिनिधी(प्रकाश कुंवर)
उत्राण (एरंडोल) :- येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीला दोघासह एका महिलेने बळजबरीने बुंदीच्या लाडूत गुंगीचे औषध देण्याच्या प्रयत्न केला परंतु विद्यार्थीनीने प्रसावधान राखून आरडाओरडा केल्याने हे तिघे गाडीवर बसून पसार झाल्याची घटना घडली

या बाबत सविस्तर माहिती अशी की उत्राण येथे दिनांक 22/09/2022आज सकाळी साडेदहा वाजता संजय(दिनकर) प्रभाकर महाजन यांची मुलगी प्रांजल हि एस बी संघवी इंटरनॅशनल स्कूल मध्ये 6वी वर्गाला आहे ती सकाळी स्कूल बस वाट पहात असतांना ,दोन अज्ञात व्यक्ती एक महिला गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली नाकात दोन्ही बाजूंनी नथ असलेली तर एक पुरुष पांढऱ्या रंगांचे कपडे परिधान केलेले यांनी या मुलीला बुंदीचा लाडू खाण्यास बळजबरी करू लागले ,मुलीने थोड्या अंतरावर असलेल्या महिलांना मुलीने आवाज दिला असता ते गाडीवर पसार झाले,
त्यामुलीने तो लाडू गल्लीतील महिलांना दाखवला असता त्या लाडूमध्ये गोळी आढळली असता गावातील नागरिकांनी शोध सुरू केला,ग्राम पंचायत सदस्य हरेश पांडे पोलीस पाटील राजेंद्र महाजन,यांनी कासोदा पोलीस स्टेशन ला माहिती कळवली,सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांच्या आदेशानुसार कॉन्स्टेबल नितीन मनोरे यांनी घटना स्थळी पाहणी केली, व तो मुलीला दिलेला लाडू तपासणी साठी नेण्यात आला
पालकांमध्ये पसरली भीती
गावातील शाळांना सूचना देण्यात आल्या की कोणीही बाहेरील व्यक्ती कडून विद्यार्थ्यांना काहीही खाऊ नये असे सांगण्यात आले.
प्रांजल हिने तो लाडू महिलांना दाखविला तो फोडून पहिला असता त्यात एक गोळी आढळून आली ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली ग्रामस्थांनी त्या तिघांच्या शोध सुरू केला मात्र ते मिळून आले नाहीत
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






