मुंबई :- शिवसेना आणि शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याची आज सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय देत शिंदे सरकारला धक्का दिला आहे. शिवसेनेला कोर्टाने अखेर परवानगी दिली आहे. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद केला. तब्बल चार तास हा युक्तिवाद चालला.
यावेळी कोर्टाने महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. खरी शिवसेना कोणती यात आम्हाला पडायचं नाही, असंही कोर्टाने म्हटलं. तसेच शिवसेनेला यापूर्वी दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली होती, असं सांगतानाच दोन्ही गटाचे अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्यच होता, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
आम्ही कोरोना काळात शिवाजी पार्क मैदान मेळाव्यासाठी मागितलं नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचा इतिहास आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची हा मुद्दा इथे नाही. दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळायला हवी. उद्या कोणीही कोणीही वैयक्तिक येऊन परवानगी मागेल तर ते योग्य नाही, असं शिवसेनेचे वकील एसपी चिनॉय यांनी कोर्टात सांगितलं.
मैदानासाठी कुणीही अर्ज करू शकतं ना? असा सवाल यावेळी कोर्टाने केला. त्यावर होय, मैदानासाठी कुणीही अर्ज करू शकतं, असं उत्तर शिवसेनेच्या वकिलाने दिलं. यापूर्वी मनसेनेही शिवाजी पार्कवर परवानगी मागण्याचा प्रयत्न केला होता, याकडेही शिवसेनेच्या वकिलाने कोर्टाचं लक्ष वेधलं.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






