जळगाव :- जळगाव शहरातील मोहाडी नाक्याजवळ असलेल्या हॉटेल गोल्डन नेस्टमध्ये गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास लव्ह जिहादच्या संशयावरून मोठा गोंधळ उडाला. तरुण-तरुणींची पार्टी सुरू असताना संशयावरून एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जमावाला पांगविले.
जळगाव शहरातील मोहाडी नाक्याजवळ डी मार्ट शेजारी हॉटेल गोल्डन नेस्ट आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हॉटेलमध्ये काही तरुण-तरुणींच्या वाढदिवसानिमित्त पार्टी सुरू होती. पार्टीत असलेल्या तरुण-तरुणींना पाहून त्या ठिकाणी असलेल्या एका महिलेला सदर प्रकार लव्ह जिहादचा जाणवला. प्रकाराची माहिती मिळताच तरुणांचा एक मोठा घोळका घटनास्थळी जमला आणि त्यांनी तरुणाला मेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळावरून जमावाला पांगवले तर जखमी तरुणाला उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह डीबी पथक हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीत कैद झालेल्या मारहाण करणाऱ्या सर्व तरुणांना तात्काळ ताब्यात देण्याचे आदेश चिंथा यांनी दिले आहे. दरम्यान, सर्व प्रकार एका राजकीय पक्षाशी संबंधित महिलेच्या गैरसमजुतीतून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






