धक्कादायक ; पप्पा! आईला नका ना मारु…; असे म्हणणार्‍या आठ वर्षाच्या मुलीवर निर्दयी बापाने झाडली गोळी,मुलीचा जीव वाचविण्यासाठी पोलिसांची धडपड.

Spread the love

धायरी (पुणे) : – आई आणि वडिलांचे भांडण सुरू असताना आईवर पिस्तूल रोखलेले पाहून पप्पा आईला मारू नका असे म्हणणार्‍या आठ वर्षीय राजनंदिनीवर तिच्या वडीलांनी गोळी झाडल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजनंदिनी पांडुरंग उभे असे आठ वर्षीय जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. मुलीवर गोळी झाडल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडील पांडुरंग उभे यास अटक केली आहे.

नवरा – बायकोच्या भांडणात स्वतःच्या आठ वर्षीय मुलीला गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. राजनंदिनी पांडुरंग उभे असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पांडुरंग तुकाराम उभे (वय :३८ वर्षे, रा. हेरंब हाईट्स, नऱ्हे, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग उभे हे कुटुंबासह नऱ्हे येथील जेएसपीएम कॉलेज जवळ असणाऱ्या परिसरात राहतात. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तसेच त्यांच्याकडे परवाना असलेले रिवाल्वर आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते दारू पिऊन घरी आले. त्यामुळे दोघा नवरा – बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात त्यांनी बायकोवर रिवाल्वर उगारली मात्र ती गोळी त्यांच्या आठ वर्षीय मुलीला छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. .

मुलीचा जीव वाचविण्यासाठी पोलिसांची धडपड…

गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पांडुरंग उभे यांना ताब्यात घेतले. तसेच ज्या खासगी रुग्णालयात जखमी राजनंदिनीवर उपचार चालू आहेत. त्या ठिकाणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी जाऊन जखमी राजनंदिनी चौकशी केली. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे सिंहगड रस्ता पोलिसांनी सांगितले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार