2 मुलासह विवाहिता युवकासोबत बेपत्ता, घरातील 50 हजार ₹ व 5 ग्रॅम सोने सोबत घेऊन गेली

Spread the love


झुंजार प्रतिनिधी एरंडोल

एरंडोल :- शहरातील गांधीपूरा महादेव मंदिर परिसरातील 38 वर्षीय विवाहिता आपल्या 2 मुलासह युवकासोबत बेपत्ता झाल्याची घटना दि 23 सप्टेंबर रोजी उशिरा रात्री घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की 33 वर्षीय रिक्षा चालक 38 वर्षीय पत्नी, 9 व 2 वर्षीय मुलासह राहतात व रीक्षा चालवून परीवाराचा उदरनिर्वाह करतो.

33 वर्षीय युवक दि.23/09/2022 रोजी दिवसभर रिक्षा चालवून उशिरा रात्री घरी आला असता त्यास पत्नी व दोन्ही मुले स्वतःच्या घरी दिसले नाही म्हणून आपल्या घरापासून जवळच बहिणीचे घर भाड्याने दिले आहे त्या भाडेकरू यांचेकडे 11.15 वा. सुमारास पत्नी व मुले हे दिसले व तेथील भाडेकरू बाईंनी सांगितले की, आम्ही इथेच झोपतो असे विवाहितेने भाडेकरू बाईंनी सांगितल्याने हा रिक्षा चालक परत आपल्या घरी येवुन झोपलो रात्री 12.15 वाजेच्या सुमारास भाडेकरु बाईंनी फोन करून सांगितले की 38 वर्षीय पत्नी 9 व 2 वर्षीय दोन्ही मुले असे तिन्ही जण माझ्या घरून निघून गेले तुझ्या घरी आले का? असे सांगितले

म्हणून रिक्षा चालक व त्याच्या भाचा यांनी घराचे आजुबाजुला तसेच. शहरात, बसस्थानक, व नाते वाईकांना फोन लावून विचारपुस केली असता पत्नी ही मिळुन न ‘आल्याने आमची खात्री झाली की, ती कुठेतरी घरात व भाडेकरु यांना न सांगता निघुन गेली आहे. तसेच रिक्षा चालक हा परत घरी जावुन खात्री केली की, रिक्षा चालक याने नविन रीक्षा घेण्यासाठी त्याची बहीण यांचेकडुन 50.000/- रु. रोख घेतलेले होते व ते घरातील स्टिल डब्यामध्ये ठेवलेले होते ते पाहता मिळुन आले नाही व आईचे सोन्याचे डोरले 5 ग्रॅम चे हे सुध्दा डब्यात होते त्याने खात्री केले असता रुपये व 5 ग्रॅम चे सोन्याचे डोरले मिळुन आले नाही

म्हणुन त्याची खात्री झाली की पत्नी ही रोख रुपये 50.000/-रुपये, व 5 ग्रॅम चे सोन्याचे डोरले घेवुन घरात कोणास न सांगता दोघे मुलासह याच परिसरात रहिवासी असलेला ज्याच्यावर संशय असलेल्या मोहन नंदु खत्री रा. एरंडोल याचेसंह कुठेतरी निघुन गेले आहेत. या बाबत एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो हे काँ सुनील लोहार हे तपास करीत आहे. दरम्यान विवाहिता व दोन्ही मुले हे संशयित सोबत दुचाकीने धरणगाव रेल्वे स्टेशनवर गेले होते अशी परिसरात दबक्या आवाजात नागरिकामध्ये चर्चा आहे.

टीम झुंजार