जळगाव :- चोरट्यांनी भरदिवसा एका मुलीचा गळा दाबून घरातून पैसे लुटल्याचा प्रकार पुढे आल्याने जळगावात एकच खळबळ उडाली आहे. तिन्ही बहुरूप्यांना नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या वाढीव वस्ती असलेल्या वाटिका आश्रम परिसरातील महिलांच्या वेशात आलेल्या तीन पुरुष घरात घुसून जबरदस्तीने पैसे लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान सतर्क नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडत यांनी लुबाडलेले पैसे परत मिळवून दिलेले आहेत. परंतु या प्रकरणी पोलिसात कोणीही तक्रार देण्यास समोरून आल्याने गुन्हा दाखल झालेला नाही
याबाबत मिळालेली माहिती अशी की शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग लगत खोटे नगर शेजारी वाटिका आश्रम आहे. या भागात काहीशी विरळ वस्ती आहे. रविवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमाराला या परिसरात महिलांच्या वेशात ( किन्नर) आलेले तीन पुरुष वेगवेगळ्या उघड्या घरांमध्ये हसत होते येथे समोर आलेल्या मुलं, मुली, वृद्ध यांच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळत होते.
मुलीचा गळा पकडून साडेतीन हजार रुपये उकळले…
या ठिकाणी राहणार एका 14 वर्षीय मुलीची आई पोळ्या करण्यासाठी बाहेर गेलेली असताना घरात तिची बहीण व आजी होती. ती साफसफाई करत असताना यातील एक जण येऊन त्याने वृद्ध महिलेला ढकलून देत मुलीचा गळा पकडून घरातून पैसे काढून आणायला सांगितले तिने त्याला साडेतीन हजार रुपये काढून दिले.
तरुणाचे पाकीट हिसकावले
एका तरुणाला या भामट्यांनी पैसे दे तुला आशीर्वाद देतो असेच सांगितले. यावर त्या तरुणाने पाकीट काढून त्यातून दहा रुपये देऊ केले असता, त्याची पाकीटच हिसकावून त्यातील हजार रुपये काढून पाकीट परत दिले.
तरुणांनी पकडून पैसे केले वसूल
या परिसरात अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही झालेल्या असून रविवारच्या घटनेची माहिती मिळताच काही तरुणांनी पुढे येऊन यात तिघा जणांना पकडून एकाच ठिकाणी आणले. आणि त्यांच्याकडून ज्यांच्या ज्यांच्याकडून त्यांनी जबरीने पैसे लुबाडले होते त्यांना ते परत देऊ केले.
तक्रार देण्यास पुढे न आल्याने सुटले
दरम्यान ही घटना घडून देखील तक्रार देण्यासाठी कोणी पुढे न आले नाही, त्यामुळे या संशयिाताना चांगलाच फायदा झाला आणि या ठिकाणी आलेल्या पोलिसांनी तिघांना सोडून दिले.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.