चोपडा : – Crime News: सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे सावत्र आई ही चांगली वागणूक देत नसल्याने दिपक कंटाळला होता. रविवारी रात्री दीपक व त्याची सावत्र आई या दोघांमध्ये वाद झाला होता.

चोपडा तालुक्यातील गलंगी येथील तरूणाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहाबाई शिवराम बारेला (वय-४५, गलंगी, ता.चोपडा) असे मयत महिलेचे नाव आहे. तर तिचा खून करणाऱ्या दीपक मगन बारेला (वय-२५ ) या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, दीपक बारेला हा सावत्र आई सहाबाई बारेला यांच्यासोबत राहतो. सावत्र आई ही चांगली वागणूक देत नसल्याने दीपक कंटाळला होता. रविवारी रात्री दीपक व त्याची सावत्र आई या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादात संतापाच्या भरात दिपकने सावत्रआईच्या डोक्यात लाकडी दांडा मारला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपनिरीक्षक अमर वसावे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत नेमका प्रकार जाणून घेतला. मयत महिलेचा संशयीत मुलगा यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या घटनेबाबत अद्याप पेालीसात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशी माहिती मिळाली आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






