जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
समोरच्यावर विश्वास ठेवताना सावध रहा. काही मुद्दे समस्येत भर घालू शकतात. आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा. या मार्गावर काही अडचणी येतील. मेहनत व परिश्रम कायम ठेवा.
वृषभ :-
घरातील कामात बराच वेळ अडकून पडाल. व्यायामाचा कंटाळा करू नका. दिवस आनंदात घालवावा. मुलांच्या भविष्याची चिंता वाटेल. काही वेळ स्वत:साठी ठेवावा.
मिथुन :-
आपली मन:स्थिती सुधारेल. चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्याल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहार करताना दक्ष रहा. आज कोणालाही उधारी देऊ नका.
कर्क :-
आपल्या कडून उत्तम सहकार्याची अपेक्षा राहील. व्यापारी वर्गाने गाफिल राहू नये. उत्तम संधी ओळखा. काही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागू शकतात. आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे.
सिंह :-
स्वत:चे काम स्वत:च करा. कोर्टाच्या कामात दिवस जाईल. अथक श्रमाचा थकवा जाणवेल. काही कामे लांबणीवर पडण्याची शक्यता. गरजेची कागदपत्रे जपून ठेवा.
कन्या :-
आपली इतरांवर चांगली छाप पाडाल. कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. मात्र वादापासून दूर राहावे. योग्य ठिकाणीच पुढाकार घ्यावा. आपली पत सांभाळून वागा.
तूळ :-
आहारातील पथ्ये पाळा. इतरांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. काही समस्या सामोरी येऊ शकतात. घरात किरकोळ कुरबुरीचे वातावरण राहील. नातेवाईकांशी सलोखा ठेवा.
वृश्चिक :-
उगाच डोक्यात राख घालू नका. कामे धिम्या गतीने पार पडतील. कमी बोलून कृतीवर भर द्यावा. याची सकारात्मक फळे दिसतील. अनेक प्रलंबित कामे मार्गी लावाल.
धनू :-
आपल्या मतानुसार सर्व गोष्टी होतील असे नाही. मनातील चीड व्यक्त करताना सबुरी बाळगा. एखादे काम मधेच सोडू नका. स्वकर्मावर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी गाफिल राहू नका.
मकर :-
जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. अधिकार्यांशी मतभेद टाळा. क्षुल्लक बाबी नजरेआड कराव्यात. इतरांच्या गोष्टीत लक्ष घालू नका. आपल्याच कामाशी संलग्न रहा.
कुंभ :-
इतरांशी मोकळेपणाने संवाद साधावा. जुन्या मित्रांशी संपर्क साधावा. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. नियोजित कामे पार पडतील. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.
मीन :-
आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. जवळच्या प्रवासात सतर्क रहा. दिवस चांगला जाईल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. तुमचा प्रभाव कायम राहील.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






