Maharashtra Shahir : इतिहास असाच घडतो…!
अखेर अजय-अतुलपर्यंत पोहोचला त्याचा आवाज! ‘चंद्रा’मुळे Viral झालेल्या अहमदनगरच्या जयेशची मोठी झेप
‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir ) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांचाच नातू व दिग्दर्शक केदार शिंदे करत आहेत. 28 एप्रिल 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याआधी या चित्रपटाबद्दलची एक मोठी अपडेट समोर आली आहे. होय, चित्रपटात छोट्या शाहीर साबळेंना आवाज देण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या एका पोराला निवडलं आहे. होय, त्याचं नाव जयेश खरे.

कलाविश्वातील अजय-अतुल ही लोकप्रिय जोडी आहे. त्यांची गाणी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावतात. केवळ मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी गाण्यांमुळे प्रेक्षकांना भुरळ घातली. सध्या अजय-अतुल गाण्यामुळे नाही तर त्यांच्या कृतीमुळे चर्चेत आहेत.
काही दिवसांपूर्वी ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ हे गाणं गाणाऱ्या एका शाळकरी मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये तो मुलगा आपल्या मधूर आवाजात ‘चंद्रा’ हे गाणं गाताना दिसत होता. जयेश खरे असं त्या शाळकरी मुलाचं नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यात राहणारा आहे. सुमधूर आवाजातील गाणं गातानाचा त्याचा व्हिडीओ अजय-अतुल यांच्यापर्यंत पोहोचला. त्याच्या आवाजाने अजय-अतुल यांनाही भुरळ पाडली आहे. जयेशला अजय-अतुल यांनी चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे.
पहा व्हिडिओ :
अजय-अतुलने त्यांच्या सोशल मीडियावरुन जयेशबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “रसिकहो, तुमच्यामुळे आम्हाला अस्सल मातीतला कलाकार सापडला…!!! ही आहे आजच्या महाराष्ट्राची ताकद, सर्वांचे मनापासून आभार ?”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये जयेश अजय-अतुल यांच्यासह गाणं रेकॉर्ड करताना दिसत आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात गाणं गाण्याची संधी अजय-अतुलने जयेशला दिली आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. “हा अस्सल मातीतला कलाकार viral video ने सापडतो. आणि थेट अजय अतुल यांच्यापर्यंत पोहोचतो. ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमासाठी त्याचं गाणं रेकॉर्ड होतं. इतिहास असाच लिहिला जातो. महाराष्ट्र शाहीर…२३ एप्रिल २०२३…!”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत अजय-अतुल यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






