लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- तालुक्यातील सावरगाव तेली येथील घरकुल योजनेतील गैरप्रकार व इतर मागण्यासाठी आज 26 सप्टेंबर रोजी लोणार पंचायत समिती येथे आम आदमी पार्टीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
लोणार तालुक्यातील सावरगाव तेली येथील सरपंच,सचिव यांनी ग्रामसभा न घेता व मासिक सभा न घेता अनुक्रमाने घरकुल लाभार्थ्यांचा समावेश न करता पक्के घर असलेल्या लाभार्थ्यांना व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदानाच्या हेतूने यादीतील अनुक्रमांक फेरफार करून गरजु लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवले असून सदर प्रकरणाची चौकशी करून सरपंच,सचिव यांच्यावर कारवाई करावी या मागणीसह इतर मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने सावरगाव तेली येथील नागरिकासह पंचायत समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.सात दिवसात कारवाई करण्यात यावी अन्यथा अमरन उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती सुनील मोरे जिल्हा प्रतिनिधी, भानुदास पवार जिल्हा प्रतिनिधी,लंबे पाटील मेहकर, गणेश सोळंके,प्रा वसंत मापारी,अविनाश आडे, विकास सानप,तौफिक अली, अशोक जाधव,डॉ विजय कायंदे,राजु चव्हाण,तेजराव अंभोरे,दीपक चव्हाण,शिवाजी राठोड,शेख नजर व सावरगाव तेली येथील शेकडो ग्रामस्थ हजर होतेे
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






