मुंबई : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच मुस्लिम धर्माचे रीतिरिवाज पाळत नाही, घटस्फोट मागते आणि मुलाचा ताबाही देत नाही, या रागातून पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली. या घटनेत जारा इक्बाल शेख (20) हिचा मृत्यू झाला असून टिळक नगर पोलिसांनी पती इकबाल मोहम्मम शेख (37) याला अटक केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इकबाल आणि रूपाली यांनी तीन वर्षांपूर्वी आंतरधर्मीय प्रेम विवाह केला होता. रुपालीच्या कुटुंबाचा याला विरोध असल्याने त्यांनी पळून जावून लग्न केले. त्यांना दोन वर्षांचा मुलागा आहे. लग्नानंतर आंतरधर्मीय असल्याने रुपालीला मुस्लिम रीतिरिवाज जमत नव्हते. तिला बुरखा पद्धती आवडत नव्हती. मात्र वारंवार इकबाल आणि त्याचे कुटुंबिय याबाबत तिच्यावर दबाव टाकत होते. यावरून त्या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून ते विभक्त झाले होते.
रुपाली तिच्या मुलासह मैत्रिणीकडे राहत होती. सोमवारी संध्याकाळी इकबाल याने रूपालीला भेटण्यासाठी चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्गावरील नागेवाडी येथे बोलावले. रूपाली तिथे गेली असता इकबालने तिच्यावर चाकूने वार करून पळून गेला.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रूपालीचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली असता टिळक नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयीत आरोपी इकबालला अटक केली आहे.
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.