जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
उत्तम वाचन कराल. जुन्या प्रश्नांची उकल होईल. आवडते पदार्थ चाखाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. सामाजिक जाणीव कायम ठेवाल.
वृषभ :-
कुटुंबासमवेत दिवस चांगला जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. दिवस खुशीत घालवाल. मित्रांशी वाद घालू नका. घराची सजावट कराल.
मिथुन :-
जोडीदाराचे कौतुक केले जाईल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. हस्त कलेचा आनंद घ्याल. एखादी आनंदवार्ता मिळेल.
कर्क :-
मनातील इच्छेपुढे इतर गोष्टी गौण मानाल. मनासारखी खरेदी कराल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. नातेवाईक भेटायला येतील. दिवस आनंदात जाईल.
सिंह :-
मित्रांकडून अनपेक्षित लाभ होतील. स्वप्नातून जागे व्हा. कामाचा आवाका लक्षात घ्या. थोडावेळ स्वत:साठी राखून ठेवा. सहकार्यांकडून फार अपेक्षा ठेऊ नका.
कन्या :-
अतिश्रमाचा ताण जाणवेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. व्यावसायिक खर्चाची चिंता मिटेल. घरातील मोठ्या लोकांचे मत जाणून घ्या. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो.
तूळ :-
चांगल्या कामासाठी प्रवास होतील. लोकांमध्ये प्रसिद्ध व्हाल. झोपेची तक्रार जाणवेल. कामात स्त्रियांची मदत होईल. पोटाची तक्रार लक्षात घ्या.
वृश्चिक :-
संसर्गजन्य विकारांपासून सावध रहा. अधिकारी वर्गाची गाठ पडेल. काही मोठ्या लोकांच्या संपर्कात याल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या.
धनू :-
शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष नको. गरजूंना मदत कराल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. परोपकाराची भावना जोपासाल.
मकर :-
नवीन कामासंदर्भात बोलणी होतील. जुन्या मतांना बाजूला सारा. अति विचार करणे टाळा. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. चिकाटी कायम ठेवा.
कुंभ :-
अतितिखट पदार्थ खाऊ नका. शिस्तीचा अतिरेक करू नका. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. घरातील कामे आवडीने कराल.
मीन :-
क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. फार गरज असेल तरच प्रवास करावा. वाहन चालवताना सावधानता बाळगा. डोकेदुखीचा त्रास संभवतो. जोडीदाराची प्रगती होईल.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






