उल्का नगरी लोणार चे आराध्य दैवत देवी कमळजा माता मंदिर सर्व भाविकांसाठी खुले‌..

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील प्राचीन असलेले कमळजा माता मंदिर नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी उघडले आहे.नवरात्रोत्सवात भाविकांसाठी ही मोठी पर्वणी असून दर्शनासाठी मोठी गर्दी आहे.कोरोनाच्या संकटकाळात सदर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते, तेव्हापासून आजपर्यंत हे मंदिर बंदच आहे.यावर्षी मात्र नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी कमळजा देवीचे मंदिर खुले केले केलेले आहे. परंतु वन्यजिव विभागाच्या वतीने भाविकांसाठी विशेष नियमावली जारी केली असून दर्शनासाठी सरोवरात प्रवेश करणाऱ्या भाविकांनी नियमांचे पालन करावे,असे आवाहन वन्यजीव अभयारण्य लोणारच्या वतीने करण्यात आले आहे.


लोणार सरोवरातील कमळजा माता देवीचे मंदिर हे जवळपास १ हजार वर्षे जुने आहे.विदर्भ मराठवाड्यातील – हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कमळजा मातेच्या दर्शन कोरोनानंतर पहिल्यांदाच घेता येणार असल्याने भाविकांमध्ये

आनंदी वातावरण आहे.सदर मंदिर सरोवरातील अभयारण्य क्षेत्रात असल्याने या जंगलातून पायी चालतच जावे लगाते.या क्षेत्रात जंगली प्राण्यांचा मुक्त संचार असतो त्यामुध्ये प्रामुख्याने बिबट्,कोल्हे,तडस यासारखे हिस्त्र प्राणी तसेच विषारीसाप सुध्दा असल्याने भाविकांनी सकाळी ६ वाजेनंतरच सुर्यप्रकाश असतांना दर्शनासाठी गटागटाने जावे,तसेच वनविभागाने नेमून दिलेल्या पायवाट रस्त्याचाच वापर करावा,सोबत कुठल्याही प्रकाच्या प्लास्टिक कॅरिबॅग नेऊ नये,नोंदणी करूनच सरोवरात प्रवेश करावा,लहान मुले,स्त्रीया,वृद्ध व्यक्तींनी आपल्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेणाऱ्या व्यक्ती सोबतच दर्शनासाठी जावे, जाताना येताना आरडा-ओरड करू नये,वन्यप्राण्यांना किंवा पक्षांना त्रास होईल असे वर्तन करु नये,आवाहन वनविभाग आणि वन्यजिव विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. वन्यजिव विभागाच्या वतीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुनच भाविकांनी कमळजा माता दर्शनासाठी यावे,असे आवाहन वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड यांनी केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार