एरंडोल :- न्यू ड्रीम क्लासेस एरंडोल यांच्या वतीने आज पासून दिनांक २८ सप्टेंबर ते ०८ ओक्टोंबर या दहा दिवसीय उपक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी जनजागृती करणे तसेच शिक्षण किती महत्त्वाचे आहे व कसे हे पालकांच्या निर्देशनात आणून देणे तसेच प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन तेथील गरीब , होतकरू व हुशार विद्यार्थ्यांची नेमणूक करून त्यांना न्यू ड्रीम क्लासेस मार्फत एक वर्ष मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. तरी दहा दिवस उपक्रमात हजर राहणार्या विद्यार्थ्यांची नेमणूक होणार आहे.

यासाठी “ न्यू ड्रीम क्लासेस ” चे विद्यार्थी व सर्व सहकारी गावातील मंडळी हे उपक्रमात सहभाग घेत आहे तसेच आजपासून सुरू होणारा उपक्रम याची प्रत्येक दिवसाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू दहा दिवसाचा कॅम्प आता एरंडोल शहरात “ केवडी पुरा ” या परिसरात सुरू झालेला आहे तरी गरीब होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना आम्ही पुढे नेण्याचा संकल्प घेत एरंडोल शहराला सुंदर व शिक्षित बनवून हा उपक्रम साध्य करू धन्यवाद आपले सहकार्य असेच असु दया.

हे सर्व “ न्यू ड्रीम क्लासेस ” चे विद्यार्थी व संचालक करून घेत आहे प्राजक्ता वैरागडे , रूपाली चौधरी , मेघा महाजन , वैभवी बोरसे , प्राजक्ता मिस्तरी , हेमांगी महाजन , सुनीता पाटील , सोहन सोनवणे , संदेश महाजन , ललित माळी , हितेश पवार , पियुष साळी आणि न्यू ड्रीम क्लासेस चे संचालक श्री नयन आरखे सर हे सर्व मेहनत घेत आहे तरी गावातील मंडळींनी सहकार्य करावे ही विनंती

हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






