भागलपूर ,:- सध्या देशात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अश्यातच रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्या एकाला प्रवाशांनी रंगेहात पकडलं. जमालपूर-साहिबगंज पॅसेंजर ट्रेनमधून मोबाईल लांबवून चोरटा पसार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र तितक्यात प्रवाशांनी त्याला पकडलं. प्रवाशांनी चोरट्याला धरून ठेवलं. तितक्यात ट्रेन सुरू झाली आणि चोर धावत्या ट्रेनबाहेर लटकू लागला.
रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्या एकाला प्रवाशांनी रंगेहात पकडलं. जमालपूर-साहिबगंज पॅसेंजर ट्रेनमधून मोबाईल लांबवून चोरटा पसार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र तितक्यात प्रवाशांनी त्याला पकडलं. प्रवाशांनी चोरट्याला धरून ठेवलं. तितक्यात ट्रेन सुरू झाली आणि चोर धावत्या ट्रेनबाहेर लटकू लागला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये मोबाईल चोर प्रवाशांकडे गयावया करताना दिसत आहे. मला कृपया सोडू नका, धरून ठेवा. अन्यथा मी मरेन, अशा शब्दांत चोरटा प्रवाशांकडे हात न सोडण्यासाठी याचना करत आहे. ही घटना लैलख-घोघा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली. चोरट्यांची एक टोळी मोबाईल घेऊन पळत होती. यादरम्यान ट्रेन सुरू झाली. सगळे चोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र एका चोराला प्रवाशांनी खिडकीतून पकडलं.
पहा व्हिडिओ :
प्रवाशांनी चोरट्याचे हात खेचले आणि धरून ठेवलं. थोड्याच वेळात ट्रेन सुटली. ट्रेननं वेग घेतला आणि चोरटा लटकला. रेल्वेनं सुसाट वेग पकडल्यावर चोरट्याची भितीनं गाळण उडाली. माझा हात सोडू नका. नाही तर मी मरेन, अशा शब्दांत त्यानं प्रवाशांना विनंती केली. थोड्या वेळानं प्रवाशांनी चोरट्याला आपत्कालीन खिडकीतून आत खेचलं आणि त्याला यथेच्छ चोप दिला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






