आजचे राशीभविष्य, ( शनिवार ०१ ऑक्टोबर २०२२)

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

मित्र व नातेवाईकांशी जपून व्यवहार करा. कचाट्यात सापडू नका. आपली ऊर्जा कामी लावा. वादाच्या प्रसंगात हस्तक्षेप करू नका. रागावर नियंत्रण ठेवावे.

वृषभ :-

स्वत:ला सतत गुंतवून ठेवा. मन स्थिर ठेवा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मित्रांशी मतभेद वाढवू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात घ्या.

मिथुन :-

कौटुंबिक समाधान लाभेल. डोक्यावरचा ताण हलका होईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. काही समस्यांचे निराकरण होईल. भविष्याचा विचार करून योजना आखा.

कर्क :-

घरासाठी खरेदी कराल. आत्ममग्न राहाल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करा. दिवस मनाजोगा घालवाल.

सिंह :-

कर्तृत्वाने लोकांपर्यंत पोहोचाल. नीतिचा मार्ग अवलंबाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आत्मविश्वास वाढीस लागेल. लाभाच्या संधींकडे लक्ष ठेवा.

कन्या :-

मनाचा गोंधळ टाळावा. कामे तत्परतेने पार पाडा. सामाजिक मान वाढेल. दिवस मावळताना थकवा जाणवेल. मनात एखादी नवीन कल्पना रूजेल.

तूळ :-

वाहन जपून चालवा. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. पद आणि अधिकार वाढेल. व्यापारी वर्गाच्या समस्या वाढू शकतात. मित्रांचा सल्ला घ्याल.

वृश्चिक :-

आहाराची पथ्ये काटेकोरपणे पाळावीत. महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकू नका. दिनक्रम व्यस्त राहील. नकारात्मक विचार दूर ठेवावेत. घरातील लोकांची मदत घ्यावी लागेल.

धनू :-

आज नवीन चैतन्य जाणवेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गरजूंना योग्य सल्ला द्याल. मदतीचे समाधान मिळेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पार पाडाल.

मकर :-

जमिनीचे व्यवहार करताना सावध रहा. प्रलोभनापासून दूर रहा. वरिष्ठांना नाराज करू नका. जबाबदार्‍या वाढतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.

कुंभ :-

तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाहन खरेदीच्या योजना आखाल. धनसंचय वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष द्यावे. सासरच्या मंडळींकडून सहकार्य लाभेल.

मीन :-

गरज ओळखून पैसे खर्च कराल. घरी पाहुणे येतील. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कार्यक्षेत्रात विशेष ध्येय साध्य होईल.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार