VIDEO : धामण समजून मण्यार सापाशी खेळणं बेतलं जीवावर; सापांबद्दलच्या अज्ञानामुळे सर्प मित्राचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

वर्धा :- एखाद्या बाबीची माहिती नसताना केलेले अघोरी धाडस कधीकधी जीवावरही बेतते. अशीच घटना वर्धा (Wardha News) जिल्ह्यात पाहायला मिळाली आहे. धामण साप समजून मण्यार सापाशी खेळण्याच्या नादात मागील वर्षी सागर महाजन आणि राहुल समर्थ या दोन युवकांना जीव गमवावा लागला होता. आता तसाच प्रकार वर्ध्याच्या सानेवाडीत दिसून आला आहे. यात जीव गमावलेल्या व्यक्तीने धामण साप समजून चक्क अति विषारी मण्यारशी खेळ खेळला, नव्हे तर तसा व्हिडीओही बनवला. पण सापांबद्दलच्या अज्ञानाने या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. सध्या मण्यार सापाशी खेळ खेळण्याचा व्हिडीओ मात्र, चांगलाच व्हायरल होत आहे.

बबलू काकडे ( वय ४२) रा. सानेवाडी असे मृत युवकाचे नाव आहे. अविवाहित असलेला बबलू पेंटिंगचे काम करायचा. गुरुवारी सायंकाळी सात वाजता त्याने प्रवीण भोंगाडे नामक व्यक्तीच्या घर परिसरातून या मण्यार सापाला पकडले होते. पण तो हा साप बिनविषारी धामण असल्याची बतावणी करत परिसरात फिरला. फिरलाच नाही तर काहींनी त्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवला. हा बिनविषारी धामण जातीचा साप असल्याचं बबलू या व्हिडीओत लोकांना सांगत आहे.

पहा व्हिडिओ :

साडेतीन फुटाचा मण्यार हाताळताना बबलूला दंश ही करायचा पण काहीच होत नाही, असेही तो लोकांना सांगायचा. अखेर गुरुवारी रात्री आठ वाजता बबलूला उलटी झाल्याचे समजताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कांबळे यांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. बबलूवर त्वरित उपचार व्हावेत म्हणून धडपड केली. मात्र, गुरुवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास बबलुची प्राणज्योत मावळली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार