चाळीसगाव , (प्रतिनिधी) :- सध्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस संशयित राहुल वाल्मीक अहिरे याने फूस लावून पळवून नेले. यानंतर तिच्यावर मेहुणबारे येथील कपाशीच्या शेतात घेवून जावून रात्रीच्या वेळी तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
दरम्यान, हा प्रकार पिडीतेने कुणास सांगू नये म्हणून तिला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्यानंतर तिने ही घटना कुणास सांगू नये, यासाठी मुलीस विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या प्रकरणी संशयित राहुल अहिरे याच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरुन भादवी कलम ३७६. ३७३(२) (एन) (२)(जे), ३०७, ५०६ आणि लैगीक गुन्हापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४,३(ए), ४, ५,(एल)(आर) ६ आदि कलन्वय गुन्हां दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पो.उप.निरिक्षक प्रकाश चव्हाण हे करीत आहेत. पीडितेस उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






