झुंजार । प्रतिनिधी वावडदा ता जळगाव(सुमित पाटील प्रतिनिधी)दि२ तालुक्यातील म्हसावद गावातुन जाणारा महामार्ग रस्त्यावर आज सकाळी ७:००वाजता गणपती मंदिरा समोर राज्यस्थान हुन येणारा ट्रक खड्ड्यात येवुन एक दोन पलटी होवून रस्त्यावर पडला. सुदैव आज सुट्टी असल्याने सकाळी लोक व गावातील मंडळी कमी असल्याने व शाळेतली जाणारे येणारी मुले व मुलींचा वापर नसल्याने जिवंत हानी टळली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
जर पर्याय व्यवस्था रस्त्याची असती तर आज हा ट्रक ही पलटी झाला नसता. या गावातुन जाणारा महामार्गा चे काम कासव गतीने चालत असुन.या ठेकेदाराने कुठलीही पर्याय रस्त्याची व्यवस्था गावातील पायी चालणाऱ्या लोकांना केलेली नाही. तरी हा गावातून जाणारा महामार्ग डोकेदुखी ठरत आहे.या रस्त्यामुळे मागील वर्षापूर्वी आंदोलन ही गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते
तरी या संबंधिती सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी निवेदन घेवुन गुलदस्त्यातच निवेदन ठेवले आहे. तरी असे वेळोवेळी गावातील ग्रामस्थ आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत असतात असा कधी भविष्यात मोठा अपघात झाल्यास याला कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न गावातील ग्रामस्थ करताना दिसत आहे.
तरी संबंधित मा.जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तातडीने या महामार्गाचा कामाचा आढावा घेऊन. संबंधित ठेकेदाराला कडक तंबी देवुन रस्त्याची झालेली दुरवस्था व गावातील लोकांना पर्याय व्यवस्था करुन द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे..
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






