चाळीसगाव :- सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील शिवशक्ती नगर येथे सासरा आणि सुनेत झालेल्या घरगुती वादात सासर्याने सुनेचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेला संपवल्यानतंर सासरा स्वतःहून पोलिसात हजर झाला आणि त्याने पोलिसांसमोर घरगुती वादाचा तपशील पोलीस समोर कथन केला आहे.
सासरच्या जाचाला कंटाळून कविता ही माहेरी गेली होती. तिला मुलगा व सव्वा दोन महिन्यांची मुलगी आहे. दोन दिवसांपूर्वी कविता ही सासरी आली होती दरम्यान सासरे सुनेच्या झालेल्या वादात सासऱ्याने सुनेला जीवे ठार मारल्याने खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की उत्तम पुंजाजी चौधरी रा. शिवशक्ती नगर यांच्या मुलाचा विवाह टेकवडे तालुका शिरपूर येथील कविता हिचेेशी झालेला आहे. विवाहानंतर कविता ही मला आणि माझी पत्नी व इतर सदस्यांची वाद घालत होती. सुनेचा एक मुलगा आणि सव्वा दोन महिन्यांची मुलगी आहे. बाळंतपणानंतर मुलाने त्याची पत्नी कविता हिला माहेरून चाळीसगाव आणलेले होते.
सून वाईट बोलल्याने आला राग
२९ सप्टेंबर रोजी पती गोकुळ कवितास आणण्यासाठी टेकवाडे ते येथे गेला. रात्री ९ वाजता ते मुलांसह चाळीसगावला आले. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उत्तम चौधरी घरी आले. त्यांनी सून कवितास चहा करण्यास सांगितले. चौधरी चहा घेत टीव्ही पाहत असताना सायंकाळी ५.३० वाजता कविता आली व तिने टीव्ही बंद करून तुम्हाला येथे बसून लाज वाटत नाही का, असे बोलली. त्याचा चौधरी यांना राग आला. ते तिच्या मागोमाग बेडरूममध्ये गेले. कवितास बेडवर ढकलून दोन्ही हातांनी तिचा गळा, नाक व तोंड दाबून तिला जीवे ठार मारले.
यादरम्यान सासरे शिवशक्ती नगर मधील मुलाच्या घरी आले. मुलगा राहुल कामानिमित्त बाहेर गेलेला होता. तर उत्तम चौधरी यांची पत्नी देखील नातवाला खेळायला घेऊन बाहेर गेलेली होती. सुनेला चहा बनवायला सांगिते. त्यावर सुनेने खडे बोल सुनावले आणि त्यानंतरही उत्तम चौधरी यांना उद्देशून बोलणे चालूच ठेवल्याने, सुनेवर राग अनावर झाला आणि बेडरूम मध्ये गळा दाबून सुनेला मारले, थोड्या वेळात स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. सासर्या या जबाबावरुन चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






