सुमित पाटील प्रतिनिधी जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर 2022 रोजी स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष सौ मनिषा पाटील व अध्यक्ष श्रीमती ज्योती राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
सुरूवात स्वच्छतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन करून करण्यात आली. गांधीजींची उच्च विचारसरणी यावर मनिषा पाटील यांनी माहिती सांगितली. ज्योती राणे यांनी लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनकार्याविषयी सांगितले कार्यक्रमाचा समारोप रघुपती राघव राजाराम या सुंदर भजनाने झाला.
याप्रसंगी नेहा जगताप, नूतन तासखेडकर , किमया पाटील मेहेजबिन अजमल शाह, गुलसबा अजमल शाह, डॉ मेराज नगावकर सौ माधुरी शिंपी च या उपस्थित होत्या. सूत्रसंचलन नेहा जगताप यांनी केले व आभार नूतन तास्खेडकर यांनी मानले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






