बायकोला पोलीस बनवण्यासाठी त्याने आपलं घर आणि जमिन विकली. पण पोलीस होताच बायको त्याला सोडून प्रियकराजवळ गेली.
असं म्हणतात प्रेम अंधळं असतं. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला भोवताली काय सुरू आहे याचं भानच नसतं. अन् जेव्हा तो भानावर येतो तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते. असाच काहीसा प्रकार बिहारमधील एका तरुणासोबत घडला. बायकोला पोलीस बनवण्यासाठी त्याने आपलं घर आणि जमिन विकली. पण पोलीस होताच बायको त्याला सोडून प्रियकराजवळ गेली. आता हा तरुण पोलीस बायको विरोधात पोलिसांकडेच न्याय मागत आहे.
नेमकं हे प्रकरण आहे तरी काय ?
बिहार मधील मिथून कुमार पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याच वेळी तो एका तरुणीच्या प्रेमात पडला. खरं तर ती देखील पोलीस भरतीची तयारी करत होती. बराच काळ ते दोघं लिव्हईन रिलेशनशिपमध्ये राहिले. अन् अखेर कुटुंबीयांच्या संमतीनं त्यांनी लग्न केलं. मिथूनचं आपल्या बायकोवर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्याने बायकोला नोकरी मिळवून देण्यासाठी स्वत:ची जमीन आणि घर देखील विकलं. अखेर एका राजकीय नेत्याच्या ओळखीनं तिला नोकरी मिळाली. पण पोलीस होताच तिने आपल्या नवऱ्याला सोडून दिलं. आता तिने आपल्या नव्या प्रिकरासोबत संसार थाटला आहे. असा दावा मिथूननं केला आहे. दरम्यान या प्रकरणी त्याने पोलीस तक्रार केली असून बायको विरोधात आर्थिक फसवणूकीचा दावा केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






