मुंबई : – सध्या देशभर नवरात्र उत्सवामुळे उत्सवाचं वातावरण आहे. या वातावरणात गरबा, दांडिया खेळण्याचा मोह कुणाला आवरत नाही. देशातील प्रत्येक शहरात गरबा खेळला जातो. मुलुंडमध्ये प्रेरणा रासमध्ये गरबा खेळताना २७ वर्षीय डोंबिवलीतील तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीत ह्दय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे मुलुंड पोलिसांनी सांगितले.डोंबिवलीतील जुनी डॉन बॉस्को शाळेमागील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये आई वडिलांसोबत राहणाऱ्या वृक्षभ मांगे (२७) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण गरबा खेळत असताना खाली कोसळताना आपल्याला दिसत आहे. यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर आजकाल तरूणांना हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना वाढल्या आहेत.
पहा व्हिडिओ :
ऋषभ मंगे भानुशाली असं या तरूणाचं नाव असून तो २७ वर्षीय असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून तो बोरिवली येथे एका खासगी कंपनीत कामाला असल्याचं सांगणयात येत आहे. डोंबिवली पश्चिम येथे तो आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. तो घरात एकटाच कमावता मुलगा असून त्यामुळे त्यांच्या घरावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






