राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यादरम्यान सेवा पंधरवडा लोणार भाजपा कडुन विविध उपक्रम घेत साजरा ..

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- तालुक्याच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्त 17 सप्टेंबर राष्ट्रनेता मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस ते 2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या दरम्यान सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात आला.यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटपाच्या कार्यक्रमापासून सुरुवात करण्यात आली.बाबुळखेड येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला.वेणी येथे हनुमान चालीसा पठण करण्यात आली.शारा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.सुलतानपूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम करून साजरी करण्यात आली.सेवा पंधरवडा निमित्त मेहकर येथे दोन्ही तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर बिबी येथे ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.मागील काळात भाजपा सरकारने केलेल्या कामगिरींचे प्रदर्शनी सुद्धा भरवण्यात आली होती.

सेवा पंधरवड्याच्या समारोपाच्या दिनी म्हणजे 2 आक्टोंबर ला रायगाव येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये विविध आजार व त्यावरील उपचार संबंधित मार्गदर्शन या संबंधित तज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले या मध्ये 18 वर्षावरील महिला व गर्भवती महिलांची तपासणी नेत्र तपासणी,दंत तपासणी,रक्त तपासणी व औषधोपचार मोफत करण्यात आले.


मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटक म्हणून मंदाकिनी कंकाळ प्रदेश सचिव अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र,गोदावरी भगवान कोकाटे अध्यक्ष रुग्ण कल्याण समिती रायगाव,अन्नपूर्णा आत्माराम तनपुरे सरपंच रायगाव,कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानराव सानप कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ.फिरोज शहा वैद्यकीय अध्यक्ष ग्रामीण रुग्णालय लोणार,डॉ.देवशाला एस.बालशेटवाड तालुका वैद्यकीय अधिकारी लोणार, गजानन मापारी शहराध्यक्ष लोणार,विजय मापारी जिल्हा नेते भाजपा,सिताराम ठोकळ महाराज जिल्हाध्यक्ष अध्यात्मिक आघाडी,देवकर मामा तालुका अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी.


आरोग्य शिबिरास सेवा देणारे डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी डॉ.रेखा नागरे वैद्यकीय अधिकारी हिरडव,डॉ.मंगेश सानप वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केद्र रायगाव,डॉ.जय आघाव वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र रायगाव,डॉ.सतीश सोनुने दंत रोग तज्ञ बिबी,डॉ.हर्ष कांबळे समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र येवती,डॉ.एम.एस. खिल्लारे नेत्रतज्ञ ग्रामीण रुग्णालय लोणार,शेठानी औषध निर्माण अधिकारी रायगाव,विनोद भांदुर्गे एलएलएम महालाॅब, डॉ.के.के.गायकवाड आ.सहाय्यक त्याचप्रमाणे खाजगी डॉ.बालरोग तज्ञ लोणार डॉ निलेश सानप,जनरल फिजिशियन डॉ.राजेश मुंदडा, जनरल फिजिशियन डॉ.प्रदीप झोरे स्त्री रोग तज्ञ डॉ.सोनाली मुंदडा,जनरल फिजिशियन डॉ.नितेश नागरे,स्त्री रोग तज्ञ डॉ.अनुपमा झोरे,स्त्रीरोग तज्ञ डॉ.छाया नागरे या सर्व डॉक्टरांच्या विशेष सहकार्याने रायगाव व परिसरातील 200 पेक्षा अधिक गरजू लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. भारतीय जनता पार्टी तालुका व शहर कार्यकर्ते प्रकाश महाराज मुंडे,उध्दव आटोळे,मारोतराव सुरुशे, प्रकाश नागरे,शेख जावेद,राम घुगे,गणेश तांगडे,गजानन नागरे,पंढरी मापारी,शिवाजी सुपेकर,भूषण शेटे,दिलीप राठोड,गणेश कुटे, जुम्मा खान,शीलाताई खाडे, गणेश डोळे,शिवशंकर आघाव इतर भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार