भोकरदन (जालना): तालुक्यातील लिंगेवाडी येथे मळणीयंत्रात अडकून चालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. संदिप सुधाकर गाढे ( 35, बाभूळगाव) असे मृताचे नाव आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, सध्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. संदिप गाढेकडे मळणीयंत्र असल्याने त्यास शेतातील कामे मिळत. आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान गावालगत असलेल्या लिंगेवाडी येथील सदाशिव साबळे यांच्या शेतात संदीप गेला होता. सोयाबीन काढण्यासाठी मळणी यंत्र सुरु असताना त्यात तांत्रिक अडचण आली. पान्हा घेऊन दुरुस्ती करत असताना तोल गेल्याने संदीप मळणी यंत्रात ओढला गेला.
हे पाहताच काहीजणांनी मळणीयंत्र बंद केले. मात्र, तोपर्यंत संदीपचा मृत्यू झाला होता. संदीपचे शीर धडा वेगळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. दरम्यान, माहिती मिळताच सपोनि रत्नदीप जोगदंड या घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह मळणी यंत्रातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
शेळ्या चोरीस गेल्यानंतर घेतले मळणीयंत्र
संदिपने बाभूळगाव येथे शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय चांगला सुरू असताना चोरट्यानी पूर्ण शेळ्या चोरून नेल्या. यामुळे संदीपने मळणीयंत्र घेतले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






