जळगाव :- सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरात कपाळावर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने घाव घालून क्रुरपणे गळा चिरुन सौरभ यशवंत चौधरी (वय ३१, रा.दशरथ नगर, जळगाव) या तरुणाची हत्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. सौरभ याचा खून कोणी व कशासाठी केला हे कारण अजून तरी समोर आलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याने जाणाऱ्या लोकांना सोमवारी सकाळी ११ वाजता भादली ते शेळगाव दरम्यान पुलानजीकच्या पाटचारीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यापैकी काही जणांनी पोलीस पाटील तर काही जणांनी नशिराबाद पोलिसांना घटना कळविली.
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ विभागाचे डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहायक फौजदार अलियार खान, हवालदार शिवदास चौधरी, रवींद्र तायडे, लिना लोखंडे व गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता क्रुरपणे गळा चिरलेला तर कपाळावर घाव घालण्यात आलेले होते. दोन्ही हातांची त्वची बाहेर आलेली होती. घटनास्थळाचा पंचनामा करुन दुपारी तीन वाजता मृतदेह शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला.
जळगावात तीन दीवसात दुसरा खुन.
दरम्यान, दोन दिवसापूर्वीच चारित्र्याच्या संशयावरुन सविता जितेंद्र पाटील (वय २०) हिचा खून पतीनेच खून केल्याची घटना शिवधाम मंदिर परिसरात घडली होती. आता हा दुसरा खून आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






