धरणगाव : – पष्टाने खु येथे माधवराव बाबुराव सोनवणे हे रात्री आपल्या मुलांसोबत घरात झोपले होते . दि 30 सप्टेंबर रोजी सकाळी एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली . झोपेत असताना श्वास गुदमरायला लागल्याने माधवराव सोनवणे व मुलगा मुकेश सोनवणे यांना जाग आली असता आग लागल्याचे निदर्शनास आले . आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले त्याच सोबत गावातील तरुण , नागरिक यांनी धाव घेत आटोक्यात आणण्यासाठी धावपळ केली परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने ती वाढतच गेली .

परिवाराचे अश्रू अनावर ..
अचानक आलेल्या आपत्ती मध्ये जुने सागवान लाकूड , फ्रीज , मोबाईल , तसेच बहुतांश संसरपयोगी साहित्य आगीने खाक केले . सोनवणे कुटुंब मजुरी करून आपला उदर निर्वाह करत असल्याने पाई पाई जमा करून उभा केलेला संसार डोळ्यासमोर भस्म होतांना अश्रूंचा बांध फुटला होता . या वेळी गावचे सरपंच किशोर पाटील ,पोलीस पाटील , नागरिक यांनी त्यांना धीर दिला . शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा घटनास्थळी जाऊन तलाठी ज्योती लोखंडे मॅडम व ग्रामसेवक साहेबराव देवरे हे पंचनामा ची प्रक्रिया करत होते.

हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






