धरणगाव : – ‘जागर स्त्री शक्तीचा’ हे दरवर्षी चालणारं अभियान अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने महाराष्ट्रात आयोजित करण्यात येते. या अभियान निमित्त आज सोमवार रोजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ‘नवरंगी संवाद’ कार्यक्रम संपन्न झाला.
महिलांनाच नव्हे तर समस्त लोकांना आजकाल नवरात्रात नऊ दिवसात एका रंगाची क्रेझ असते, हे आपण गेली काही वर्षे पाहत आलोय. रंग आलेत कुठून, त्याने मार्केटिंग कस होतं ? हे आपण या अभियानात सांगत असतो.
रंग शब्द टाळणं, नवरंगी म्हटलं की रंगाचं उदात्तीकरण किंवा समर्थन करणं असा अर्थ नसून त्याच रंगाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधून संवाद होऊ शकेल अशी भूमिका यातून असल्याचे यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्यवाह दिगंबर कट्यारे यांनी सांगितले. विद्यार्थिनींनी यावेळी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवीत त्यांच्या मनात श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी असलेली प्रश्न दिल खुलासपणे मांडलेत.
प्रसंगी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यावाह दिगंबर कट्यारे यांच्यासह धरणगाव जिल्हा जळगाव येथील कार्यकर्ते जितेंद्र महाजन, विद्यालयाच्या शिक्षिका कविता महाजन, नेत्रा पवार, रेखा पवार व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






