जळगाव : – जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात विजेच्या खांबावरील लाईट दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढलेला तरुणाचा विजेचा धक्का लागून तो खाली कोसळल्याने जखमी झाल्याची घटना घडली होती. या जखमी तरुणाचा आज मंगळवारी दुपारी ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चंद्रकांत दत्तात्रय ठाकरे (वय-२३, रा. मोहाडी) असं मयत तरुणाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत ठाकरे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे वास्तव्यास होता. चंद्रकांत हा मोहाडी ग्रामपंचायत कार्यालयात पाणी पुरवठा विभागात नोकरीला होता. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गावातील विजेचा खांब्यावरील लाईट बंद असल्याने चंद्रकांत खांब्यावर चढला.
बंद लाईट दुरुस्त करत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसून खाली कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






