चोपडा,(प्रतिनिधी)- सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गांवा जवळ संकेत हॉटेल समोर असलेल्या पाटाचे चारी जवळ अज्ञात इसमाने एका ३० वर्षीय तरुणांच्या गुप्त अंगावर मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून मयताचे नांव दिनेश वेरसिंग सस्ते (पावरा) वय ३० रा. पिसनावल ता सेवा बडवणी ह.मु. अकुलखेडा ता चोपडा असे आहे.सदर घटना दिनांक ०२/१०/२०२२ रोजीचे सांयकाळी १६.३० ते दिनांक ०३/१०/२०२ २ रोजी सकाळी १०.३० वा पुर्वी दरम्यान घडली आहे याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीच्या भावाने दिलेल्या फिर्याद नुसार दिनांक ०२/१०/२०२२ रोजीचे सांयकाळी ४.३० ते दिनांक ०३/१०/२०२२ रोजी सकाळी १०.३० वा पुर्वी कोणी तरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणावरुन फिर्यादी दिलीप वेरसिंग सस्ते (पावरा ) याचा भाऊ नामे दिनेश वेरसिंग सस्ते ( पावरा) वय ३० रा. पिसनावल ता सेधंवा जि बडवणी ह.मु. २ अकुलखेडा ता चोपडा यास अकुलखेडा गांवाजवळ संकेत हॉटेल समोर असलेल्या पाटाचे चारीजवळ कोणत्या तरी अज्ञात वस्तु त्याचे गुप्त जे अंगावर मारुन गुप्त अंगास गंभीर दुखापत करुन त्याचा खुन केला आहे.
मयताचा भाऊ दिलीप वेरसिंग (पावरा) वय ३५ धंदा रा. पिसनावल ता सेधंवा जि बडवणी ह.मु. चोपडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञता विरुद्ध CCTNS गुरन ४९४/२०२ २ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमलदार अवतारसिंग चव्हाण पोलीस निरीक्षक चोपडा शहर हे करित आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






