यावल : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील 22 वर्षीय तरूणाने ठाणे (मुंबई) येथील मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. गणेश अनिल निंबायत असे या तरूणाचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने सुसाइड नोट लिहत निराशा व्यक्त केली आहे.
किनगाव बुद्रुक येथील रहिवासी गणेश निंबायत हा तरुण ठाणे (मुंबई) येथे गोदरेज कंपनीत नोकरीला होता. गणेशने बुधवारी पहाटेपुर्वी मामाच्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली. तत्पूर्वी चिठ्ठी लिहित मी एक जवाबदार मुलगा होवू शकलो नाही, मी एक जवाबदार भाऊ होवू शकलो नाही असे लिहून आपली निराशा स्पष्ट केली आहे. तरुणाच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परीवार आहे. त्याचा मृतदेह बुधवारी रात्री किनगावात आणून अंतसंस्कार करण्यात आले.
इंग्रजीत लिहिली सुसाईड नोट
चुपचुपके रोया मेरी परेशानी छुपा के, हर चेहरे के आगे थक चुका हू मुस्कुराके.. अशी सुरवात करीत सामान्य कुटुंबातील या तरूणाने इंग्रजी भाषेत सुसाइड नोट लिहत आपण जवाबदारी पार पाडू शकलो नाही, असे सांगत एक पक्षाचे चित्र रेखाटून तुमचा पक्षी उडाला, असा संदेश कुटुंबास दिला आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






