जळगाव : – सध्या महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरातील महिलेवर झालेल्या अत्याचाराची संतापजनक घटना समोर आलीय. जळगावातील 29 वर्षीय विवाहितेवर बिहारमध्ये अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
29 वर्षीय पीडीता मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती कामानिमित्त जळगावातील एका भागात पतीसह राहते. विवाहितेचा पतीसोबत कौटुंबिक वाद झाला. यावेळी पीडीतेसोबत काम करणारा राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) याने फोनवरून संवाद साधत विश्वास संपादन केला.
त्यानंतर राजेशकुमार याने पीडीतेला बिहारमधील गावाकडे बोलावत तिच्यावर 6 ते 9 सप्टेंबरदरम्यान बलात्कार केला तसेच घटनेची वाच्यता कुणाकडे न करण्याबाबत धमकी दिली. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






