बुलडाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहिर…

Spread the love

जिल्हा अध्यक्ष पदी चंद्रकांत बर्दे,कार्याध्यक्ष पदी अजय बिल्लारी,सतिषअप्पा दुडे तर सरचिटणीस पदी संदिप शुक्ला..

लोणार/उध्दव आटोळे

बुलडाणा :- मराठी पत्रकार परिषद मुंबई सोबत सलग्नित असलेल्या बुलडाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या नेतृत्वात उर्वरीत कार्यकारणी मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम. देशमुख,किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे व अमरावती विभागीय सचिव अमर राऊत यांच्या सहीनिशी आज दि. 6 ऑक्टोंबर 2022 रोजी बुलडाणा जिल्हा पत्रकार भवन येथे जाहिर करण्यात आली आहे.कार्याध्यक्ष पदी अजय बिल्लारी, सतिषअप्पा दुडे तर सरचिटणीस पदी संदिप शुक्ता यांची नियुक्ती करण्यात आली.


पुढील कार्यकारणीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून चंद्रकांत बर्दे यांची यापुर्वीच निवड झाली होती.आता परिषद प्रतिनिधी म्हणून नितिन शिरसाठ,रणजित राजपूत तर कार्याध्यक्ष पदी अजय बिल्लारी,सतिषअप्पा दुडे, सरचिटणीस म्हणून संदिप शुक्ला,सचिव म्हणून शेख कासिम,विश्‍वास पाटील मोताळा,डॉ.अनिल मापारी लोणार,दत्ताभाऊ उमाळे मेहकर,तर उपाध्यक्ष पदी निलेश जोशी बुलडाणा, अनिल उंबरकर शेगांव, रामदास कहाळे सिंदखेड राजा,संजय खेडेकर चिखली, तर संघटक म्हणून संजय जाधव बुलडाणा,वासुदेव राजनकर जळगांव जामोद, हरिभाऊ गोसावी मलकापूर, फिरोज शहा मेहकर,तर कोषाध्यक्ष म्हणून रविंद्र गणेशे, प्रसिध्दी प्रमुख संदिप वानखेडे बुलडाणा,महिला प्रतिनिधी म्हणून सौ.सुषमा राऊत देऊळगाव राजा,कु.मृणाल सोमनाथ सावळे बुलडाणा, सह सचिव म्हणून यशवंत पिंगळे नांदुरा,सह संघटक गजानन तिडके देऊळगांव राजा,सह संघटक अझर अली संग्रामपूर,तर जिल्हा सदस्य म्हणून गजानन राऊत,जितेंद्र कायस्त,उमेश पटोकार,विजय देशमुख,निसार अंसारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे सर्व माजी जिल्हाध्यक्ष राहतील.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार