जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
घरात सजावटीची कामे कराल. आपल्या स्मरणशक्तीचा फायदा होईल. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल. धनलाभाचे योग जुळून येतील. मित्रांशी गप्पा मारण्यात वेळ घालवाल.
वृषभ :-
काही नवीन शिकण्याचा योग येईल. स्वत:ला कामात गुंतवून घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. मित्रांची बाजू जाणून घ्या. घरात टापटीप ठेवाल.
मिथुन :-
कौटुंबिक मदत लाभेल. दिवस समाधानात जाईल. महत्त्वाच्या कामाची अंमलबजावणी कराल. आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष नको. हस्त कलेसाठी वेळ काढावा.
कर्क :-
हातातील काम जिद्दीने पूर्ण कराल. व्यापार्यांची जुनी कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. नातेवाईकांची गाठ पडेल. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.
सिंह :-
सल्ला मागणार्यांना योग्य मार्गदर्शन करा. प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. समोरील गोष्टीत आनंद माना. घरगुती खर्च आटोक्यात ठेवा.
कन्या :-
कामाचा ताण लक्षात घ्यावा. घरगुती गप्पांमध्ये गुंग व्हाल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. चर्चेतून मार्ग काढता येईल. जोडीदाराची बाजू जाणून घ्या.
तूळ :-
दिवसभर कामात अडकून राहाल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीने बोलाल. झोपेची तक्रार राहील. आजचा दिवस चांगला जाईल.
वृश्चिक :-
लहान प्रवास घडेल. दिवस संमिश्र जाईल. रागाला आवर घालावी. मन विचलीत करणार्या घटना घडू शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे.
धनू :-
हातातील काम मनापासून करावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. तरुण वर्गाकडून काही शिकायला मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक भावना वाढीस लागेल.
मकर :-
सर्व खात्री करूनच जबाबदारी घ्या. बाहेर फिरताना सतर्क राहावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करा. व्यापारीवर्ग खुश राहील. कमिशन मधून लाभ कमवाल.
कुंभ :-
नवीन कामासाठी संकल्प करावा. अनावश्यक खर्च टाळावा. बोलताना भान राखावे. संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक अडचणींकडे लक्ष द्या.
मीन :-
विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. अनावश्यक खर्च टाळावा. मनातील निराशेला दूर सारा.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






