मुंबई : – सध्या देशात रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. गर्दीच्या वेळी लोकलच्या डब्यातली होणारी भांडणं मुंबईकरांसाठी नवी नक्कीच नाहीत. रोज कुठेना कुठेना अगदी क्षुल्लक कारणांवरुन बाचाबाची, मारहाण असे प्रकार घडत असतात. सीटवर बसण्यावरुन तर नेहमीच मारहाणीच्या घटना घडत असतात. अशातच आता लोकलच्या लेडिज डब्ब्यात झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दोन महिला तावातावाने एका तरुणीला जाब विचारत मारहाण करु लागल्याचं दिसून आलंय. केस ओढत, पाठीत बुक्के घालत, या महिलेवर इतर प्रवासी महिला तुटून पडल्या होत्या. याच डब्ब्यात असणाऱ्या काही महिलांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. ही घटना मुंबईच्या ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर घडली. ठाणे-पनवेल लोकलदरम्यान, ही हाणामारी झाली.
पहा व्हिडिओ :
शाब्दिक वादाचे रूपांतर तुफान मारामारीत
ठाण्यावरून बसलेल्या आज्जू तोवित खान आणि गुळनाथ जुबेरखान यांनी स्नेहा देवडे या महिलेशी सीटवरून वाद सुरू केला. त्यानंतर या शाब्दिक वादाचे रूपांतर तुफान मारामारीत झाले. या लोकलमध्ये नेरूळ स्थानकातून महिला पोलीस कर्मचारी शारदा उगले भांडण सोडवण्यासाठी चढल्या.
मात्र यावेळी मारामारी करणाऱ्या आरोपी आज्जू तोवित खान हिने महिला पोलिसाला सुध्दा मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला लागून त्या देखील रक्तबंबाळ झाल्या. स्नेहा देवडे या देखील या मारहाणीत जखमी झाल्या आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






