सोयगाव, दि.०७..जरंडी उपकेंद्रातून वीज जोडणी केलेल्या घोसला गावात पंधरा दिवसापासून गाव वीजपुरवठ्याचे तिन्ही रोहित्र जळाले आहे.त्यामुळे पंधरा दिवसापासून गावात अंधार पसरला आहे.अंधारात न दिसल्याने ओट्यावरून पाय घसरून ५५ वर्षीय महिला गंभीर झाली आहे या महिलेला पाचोरा जि.जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घोसला ता सोयगाव येथे गाव वीज पुरवठ्याचे तिन्ही रोहित्रे जळून खाक झाली आहे त्यामुळे घोसला गावात पंधरा दिवसापासून अंधार पसरला असून येथील ग्रामस्थाची अंधारामुळे गैरसोय झाली असून अंधारात रस्ताच न दिसल्याने प्रतिभा जगन बोरसे(वय ५५) या ओट्यावरून पाय घसरून तोल गेल्याने त्या गंभीर झाल्याची घटना विजेअभावी घोसला गावात घडली आहे
घोसला गावातील गाव वीज पुरवठ्याचे तिन्ही रोहित्रे जळून खाक झाली आहे महावितरण कडून सिल्लोड आणि कन्नड वरून रोहित्रे मागविण्यात येतात परंतु नवीन बसविलेले रोहित्रे महावितरण कडून आधीच बिघाड झालेले रोहित्रे पंधरा दिवसापासून घोसला गावाला देण्यात येत असून नवीन रोहित्रे बसविताच पुन्हा जळून खाक होत आहे.१५ दिवसापासून घोसला गावात हाच खेळ सुरू असून ग्रामस्थांना १५ दिवसा पासून अंधारात राहावे लागत आहे त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून पीठ गिरण्या बंद झाल्या आहेत तर वीज पुरवठ्याचे अभावी गावातील पाणी पुरवठा ठप्प झालेला आहे दरम्यान घोसला गावाच्या लाईनमन कडून कोणत्याही उपाय योजना हाती घेण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे .
घोसला गावाच्या ठप्प झालेंल्या वीज पुरवठ्याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहे. दरम्यान घोसला गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले असल्याने अंधारात गावात वन्यप्राण्यांची शिरण्याची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे ग्रामस्थच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे महावितरण कडून नवीन रोहित्रे आणण्यात येतात परंतु ही रोहित्रे बसविताच पुन्हा स्फोट होऊन जळून जात आहे महावितरणच्या सिल्लोड आणि कन्नड विभागाकडून अद्याप पर्यंत महावितरण च्या वीज मंडळाने आठ वेळा रोहित्रे आणली त्यात मोठा खर्च झाला परंतु ही आणलेली रोहित्रे पुन्हा नादुरुस्त मिळत आहे त्यामुळे घोसला गावाचा अंधारातील मुक्काम वाढत आहे
चौकट–घोसला गावाचा नवरात्रोत्सव व विजया दशमी सण अंधारातच साजरा करावा लागला आहे त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून गावाचा लाईनमन मात्र हातवर करत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






