नाशिकमध्ये मोठी दुर्घटना! खासगी ट्रॅव्हल्स ला भीषण आग ; दहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Spread the love

नाशिकः – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. मिरची चौकात पहाटेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मयतांमध्ये सर्व पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात २१ प्रवाशी जखमी आहे तर १ गंभीर जखमी आहे. या भीषण अपघातानंतर अपघातानंतर काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा भीषण अपघात घडला आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी केली आहे. ही बस यवतमाळहून मुंबईकडे निघाली होती. मात्र वाटेतच बसला आग लागली. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

शनिवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. तसंच, बचावकार्य सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळी झोपेत असताना गाडी दुसऱ्या गाडीला धडकली. काही समजण्यापूर्वीच आग लागली. मी खिडकीतून उडी मारत बाहेर निघाल्याने जीव वाचला. सोबत तीन लहान मुली होत्या. सुदैवाने त्यांचेही प्राण वाचले. अग्निशमन यंत्रणा वीस मिनिटांनी पोहोचली, अशी माहिती एका प्रवाशाने दिली आहे.

प्रवाशांचा थरारक अनुभव :

सकाळी मी झोपेत असताना गाडी दुसऱ्या गाडीला धडकली. काही समजण्यापूर्वीच आग लागली. मी खिडकीतून उडी मारत बाहेर निघाल्याने जीव वाचला. सोबत तीन लहान मुली होत्या. सुदैवाने त्यांचेही प्राण वाचले. अग्निशमन यंत्रणा वीस मिनिटांनी पोहोचली.

अनिता सुकदेव चौधरी, रा.लोणी, वाशीम

मामा आणि काकांसोबत जात असताना गाडीचा अपघात झाला. आम्ही खिडकीतून उड्या घेतल्या. आम्ही कल्याणला जात होतो. मामा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. माझी प्रकृती ठीक आहे. अतिशय भयंकर अपघात होता. आम्ही वाचलो हेच सुदैव.

पिराजी सुभाष धोत्रे, रा. अरणी, यवतमाळ

जखमींचा सर्व खर्च सरकार करणार : मुख्यमंत्री

दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवर हे घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी झोन-१च्या सगळ्या पोलिस ठाण्यातील पथके कामाला लावली आहेत. ३ पथके घटनास्थळी. उर्वरित तीन टीम जिल्हा रुग्णालयात. पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरु आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे तर जखमींचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचं मुओ शिंदेंनी सांगितलं आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार