VIDEO: नासिक अपघातानंतर बसने अचानक पेट घेतला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; नाशिकच्या अपघाताचा थरारक उडवणारा व्हिडिओ.

Spread the love

११ जणांचा जागीच कोळसा झाला; मृतांमध्ये आई आणि बाळाचाही समावेश

नाशिक :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच नाशिक-औरंगाबाद मार्गावरील नांदूरनाका या ठिकाणी खाजगी प्रवाशी बसचा आणि आयशर ट्रेलरचा मोठा अपघात झाला आहे. अपघातानंतर बसने अचानक पेट घेतल्याने आगीत होरपळून ११ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.

शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातावेळी बसमध्ये सारे प्रवासी साखरझोपेत होते. त्याचदरम्यान अचानक बस आणि आयशर ट्रेलरची समोरासमोर धडक बसली. यानंतर बसने अचानक पेट घेतला. बसनं पेट घेतल्यानंतर काही सतर्क नागरिकांनी खिडक्यांमधून खाली उडी घेत जीव वाचवला. पण काही प्रवाशांना अचानक घडलेल्या घटनेमुळं बसमधून बाहरे पडता आलं नाही. त्यातच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. आत्तापर्यंत या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात घडल्यानंतर बसने पेट घेतला त्यावेळेचा लाइव्ह व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत संपूर्ण बसच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून येते. संपूर्ण बसला आगीने वेढा घातला असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. त्यावरुनच या अपघाताची तीव्रता दिसून येतेय.

पहा व्हिडिओ :

मृतांना पाच लाखांची मदत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या अपघाताविषयी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, ‘सर्व पोलीस अधिकारी आणि एसपी यांच्याशी बोलणं झालं असून एकूण ११ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर ३८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून खासगी रुग्णालयातूनही मदतीच्या सूचना दिल्या आहेत. महापौर घटनास्थळी आहेत. जिल्हाधिकारांशी बोललो. या अपघाताची चौकशी केली जाईल तर सध्या जखमींना मदत करण्यास प्राधान्य दिले आहे. सर्व उपचार शासनाच्या वतीने केला जाईल तर मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये देण्यात येईल’ अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार