नाशिक : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच नाशिक जिल्ह्यात आज सकाळ पासून दुर्घटनांचे सत्र सुरू आहे. शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघात झाला आहे. गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाडपासून जवळच पुणे-इंदौर महामार्गावर घडली आहे.
ट्रकला आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक २ किलोमीटर अंतरावरच रोखून धरण्यात आली आहे. ट्रकमध्ये गॅस ने भरलेले सुमारे २०० सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पहा व्हिडिओ :
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






