निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
मुक्ताईनगर :- तालुक्यातील मानेगाव उचंदा आणि मेडसावंगे या भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाची टीम बोटीने प्रवास करत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू बनवली जात होती.मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 8 रोजी विभागीय निरीक्षक श्री सुजित ओ कपाटे राज्य उत्पादन शुल्क भुसावळ जिल्हा जळगाव यांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र चांगदेव येथून खाजगी बोटीने पूर्णा नदी पात्रातील मानेगाव उचंदा आणि मेळसांगवे शिवारातील बेटांवर छापे टाकून एकूण 11960लि. रसायन गावठी हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे इतर साहित्य व रसायने प्लॅस्टिक व पत्रिका मिळून रुपये 2.62.500 चा मुद्देमाल मिळून आला रसायन जागीच नाश करण्यात आले.

घटनास्थळी कोणताही आरोपी मिळून आला नसल्याने आरोपीचा शोध घेणे सुरू आहे सदर कारवाई विभागीय निरीक्षक श्री सुजित ओ कपाटे राज्य उत्पादन शुल्क भुसावळ सहायक पोलीस निरीक्षक श्री जालिंदर साहेब श्री राजेश नी सोनार दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भुसावळ श्री अमोल भडांगे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका तसेच विभागीय निरीक्षक पथकाचे जवान वाहनचालक सागर देशमुख गोकुळ अहिरे सहा दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ जवान सर्वश्री नितीन पाटील योगेश राठोड अमोल पाटील भूषण परदेशी नंदू ननवरे विजय परदेशी आणि पोलीस कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांनी यशस्वीरित्या पार पाडला गुन्ह्यांचा तपास निरीक्षक श्री सुजित व कपाटे व दुय्यम निरीक्षक श्री राजेश सोनार आणि दुय्यम निरीक्षक श्री अमोल भडांगे हे करीत आहेत.

हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






