निंभोरा प्रतिनिधी:-
रावेर :- तालुक्यातील सावदा येथे मोठा आळ परिसरात दि.६ ऑक्टोंबर २०२२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास श्री दुर्गा विसर्जन मिरवणुकचे वृत्तसंकलन व माहिती गोळा करीत असताना पत्रकार जितेंद्र अशोक कुलकर्णी उर्फ पिंटू कुलकर्णी यांना काही एक कारण नसताना लतेश रमेश सरोदे व त्याचा सोबत त्याचे दोन मित्र नाव गाव माहित नाही यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून दि.७ ऑक्टोंबर रोजी सदर प्रकारे अन्याय झालेल्या पत्रकार जितेंद्र कुलकर्णी सोबत सातपुडा जर्नलिस्ट असोशियनचे अध्यक्ष तथा साप्ताहिक लेवाजगत वृत्तपत्राचे संपादक शाम पाटील,पत्रकार प्रविण पाटील,दीपक श्रावगे,रवींद्र हिवरकर,आत्माराम तायडे,राजू दिपके,साजिद उर्फ मडा,युसुफ शाह,दिलीप चांदलकर,फरीद शेख व कोचुर येथील पत्रकार कमलाकर पाटील,पंकज पाटील,राजेंद्र भारंबे चिनावल यांनी गुन्हेगाराविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व अन्यायग्रस्त पत्रकारास न्याय मिळावा याकरिता सावदा पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित होते.
सदर प्रकरणी पत्रकार जितेंद्र अशोक कुलकर्णी उर्फ पिंटू कुलकर्णी यांनी सावदा पोलिस ठाण्यात समक्ष हाजर होवून दि.८ ऑक्टोंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून सामनेवाला लतेश रमेश सरोदे व त्याचे सोबत असलेल्या नाव गाव माहित नाही अंशाविरुद्ध पनाका रजि.नं.६३६/२०२२ भादवीचे कलम ३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






