जळगाव : शहर वाहतूक शाखेत कार्यरत पोलिस भावाकडून सख्ख्या बहिणीला ठार करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी बहिणीने तक्रार दिल्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. तक्रारदार बहीण संघमित्रा सुपडू शिंगारे (वय ४२, रा. संभाजीनगर, गाडगेबाबा चौक) येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा सख्खा भाऊ महेंद्र शिंगारे पोलिस नाईक म्हणून भुसावळ शहर वाहतूक शाखेत कार्यरत असून, काही दिवसांपासून बहीण-भावामध्ये कौटुंबिक वाद आहे.
याच वादातून महेंद्र शिंगारे याने (ता. ३१ ऑगस्ट) दुपारी तीनला बहीण संघमित्रा शिंगारे यांना फोनवरून शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिनाभरानंतर बहिणीने तक्रार दिल्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्यात पोलिस भावाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. सहाय्यक फौजदार संजय चौधरी तपास करीत आहे
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






