तुमची बुद्धी गोठली नसेल तर, बाळासाहेबांचं नाव वापरु नका : उद्धव ठाकरे
मुंबई :- Uddhav thackeray Live : शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत आहेत.
४० डोक्याच्या रावणाने रामाचं धनुष्यबाण गोठवलं. गोठलेल्या रक्ताची माणसंच असं कृत्य करु शकतात. उलट्या काळजाच्या माणसांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली. ज्या शिवसेनेने मोठं केलं, त्याच शिवसेनेचा घात केला. कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचं धनुष्यबाण गोठवलं. धनुष्यबाण गोठल्याचा आनंद महाशक्तीला आता होत खूपच असेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला.
शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता. पण शिवसेना संकटांना घाबरणारी नाही. शिवसेना नेटाने उभी राहिल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
तुमची बुद्धी गोठली नसेल तर, बाळासाहेबांचं नाव वापरु नका : उद्धव ठाकरे
मिंधे गटाचा भाजप पुरेपुर वापर करत आहे. त्या ४० जणांचा वापर झाला की फेकून देतील. निष्ठा ही विकत घेता येत नसते, हे परवाच्या मेळाव्यात दिसलं. भाजप शिंदे गटाचा हेतू शिवसेना संपवण्याचा आहे. काँग्रेसनेही शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही. तुमची बुद्धी गोठली नसेल तर, बाळासाहेबांचं नाव वापरु नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आमची चिन्ह आणि नावं जनतेसमोर कशी आली?
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पर्यायी तीन नावं आणि तीन चिन्ह कशी जनतेसमोर आली हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे अशी तीन नावं आम्ही निवडणूक आयोगाला दिली होती. त्रिशुल, धगधगती मशाल आणि उगवता सूर्य ही तीन चिन्ह आम्ही निवडणूक आयोगाला पाठवली होती. ही नावं निवडणूक आयोगाने जनतेसमोर आणली. शिंदे गटाची नावं अजून समोर आली नाहीत? की त्यांनी दिली नाहीत? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






