Viral Video: सध्या देशात काही दिवसात सोशल मीडियावर मुलींच्या भांडणाचे व्हिडीओ वारंवार व्हायरल होत आहेत. यातील बहुतांश व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणी या मॉडर्न आणि उच्चशिक्षित दिसत आहेत पण तरीही अंगाईड कुत्र्या मांजरासारखी भांडणे करताना या तरुणींनी आजूबाजूला कोण आहे याचेही भान नाहीच असेच दिसून येतेय. यावेळेसही अशाच दोन तरुणी लढताना दिसत आहेत मात्र कारण जरा गंभीर आणि लक्ष देण्यासारखं आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये भररस्त्यात तरुणींमध्ये जुंपली रंगली आहे नेमकं असं काय झालं होतं हे आपण पाहुयात…
व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, दोन तरुणी या अगोदरच भांडणाचा एक राउंड संपवून बसल्या आहेत. आणि आता फेरीची भांडणे सुरु होणार इतक्यात कोणीतरी शूटिंग सुरु केलेले दिसतेय. एक तरुणी दुसरीवर स्वतःचे नग्न फोटो एका पुरुषाला पाठवल्याचा आरोप करत आहे. यामध्ये तरुणी मास्क घालून भांडत आहेत. पहिल्या तरुणीचा आरोप ऐकून दुसरी मुलगी तिला पुरावे मागते पण यावर माझ्याकडे पुरावे आहेत असा दावा करून ती फोटो लीक करण्याबाबत स्पष्टीकरण मागत पुन्हा दुसरीला मारहाण करू लागते.
पहा न्यूड फोटोवरून मुलींची मारामारी
दोन्ही मुली एकमेकींना अत्यंत वाईट भाषेत शिवीगाळ करतात त्यामुळे घटनास्थळी उभी असणारी इतर मंडळीही शरमून जातात पण विशेष म्हणजे त्यांच्या भांडणात कोणीही हस्तक्षेप करायला जात नाही. शेवटी दोघीही पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगतात आणि व्हिडीओ बंद होतो. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी प्रश्न केला आहे. अशा प्रकारे रस्त्यात हाणामारीपर्यंत गोष्टी जातात कशा असे म्हणत काहींनी पोलिसांच्या दक्षतेवरही प्रश्न उभे केले आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






