निरवांगी येथील जाधव वस्ती मध्ये राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे..

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.


निरवांगी :- ( ता. इंदापूर )
निरवांगी ते निमगाव रस्त्यापासून जाधव वस्ती एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. या वस्तीमधून हायस्कूलमध्ये जाणारे विद्यार्थी अनेक आहेत, तसेच दररोज 500ते 600 लिटर दूध संकलन होत आहे, दूध गावात आणण्यासाठी अक्षरशः डोक्यावर घेऊन चालत यावे लागते,
जाधव वस्तीवर प्राथमिक शाळा आहे, या शाळेमध्ये जाणाऱ्या शिक्षकांना आपली गाडी रोडवर लावून चालत जावे लागते.


वयोवृद्ध लोकांना दवाखान्यात येण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागतो.
गावात बाजारात येण्यासाठी, काही सामान ने-आण करण्यासाठी नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. तसेच जाधव वस्तीवरील मराठी शाळेची‌ इमारत अवस्था खूपच बिकट झालेली आहे, इमारत कधी खाली पडेल हे सांगता येत नाही.
जाधव वस्तीवर जाताना- येताना अक्षरशः चिखलातून जावे लागते, जमीन काळी असल्यामुळे एकदा पाऊस झाला की आठ ते दहा दिवस या रस्त्यांमधून जाणे म्हणजे खूपच त्रासदायक आहे, या रस्त्याकडे आज पर्यंत कोणीही लक्ष दिलेले नाही, तरी कृपया याकडे कोणी लक्ष देईल का, याची चिंता येथील नागरिकांना येत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार